Press "Enter" to skip to content

रस्त्याच्या दुतर्फा गवत वाढल्यामुळे अपघाताचा धोका

सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव : पाताळगंगा 🔷🔶🔷🔶

 सावरोली खारपाडा या रस्त्याच्या दुर्तफा मोठ्या प्रमाणात गवत वाढल्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर संभवत आहे.शिवाय पावसामुळे काही ठिकाणी साईट पट्टी च्या च्या ठिकाणी गवत असल्यामुळे रात्रीच्या वेळी मोठा अपघात होवू शकतो.गेल्या वर्षी पावसाळ्यात साईट पट्टी खचली असल्यामुळे ती दुरुस्ती करण्यात आली होती.मात्र वाढलेल्या गवतामुळे रस्त्यावरील साईट पट्टी खचली आहे हे निदर्शनास येत नाही.त्याच बरोबर रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत आणी खचलेली साईट पट्ट्या सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे.मात्र पावसाळा संपत आला असला तरी सुद्धा या ठिकाणी वाढलेले गवताची छाटणी झाली नसल्यामुळे सदर या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी वर्ग नाराजीचा सुर उमटत आहे.

तालुक्यातील असलेल्या बहुतेक रस्त्यावर वाढलेले गवत मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे.काही ठिकाणी वाढलेले गवत सात ते आठ फुट वाढले असल्यामुळे समोरील येणा-या वहानांचे अंदाज येत नसल्यामुळे अपघातांची समस्या गंभीर बनत आहे काही तुरळक ठिकाणी वाढलेल्या गवताची छाटणी सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र असे असले तरी सुद्धा आपघात झाल्यावर संबंधित या रस्त्याच्या अधिकारी यांना जाग येइल का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

 तालुक्यातील असलेले काही रस्त्याची तर दुरवस्था आहेच मात्र वाढलेले गवत त्या मध्ये अणखीन भर पडत आहे.काही वळणार गवत खूप वाढले असून रस्त्याच्या बाजूला झुकलेले पहावयास मिळत आहे.वहान चालकांस धोका त्याच बरोबर रस्त्याची साईट पट्टी आजही काही ठिकाणी खचलेल्या स्थितीत पहावयास मिळत आहे.मात्र या रस्त्याच्या दुर्तफा वाढलेले हे गवत आपघाताला निमंत्रण देत आहे.  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.