Press "Enter" to skip to content

न्हावे सरपंच जितेंद्र म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम


सिटी बेल लाइव्ह / उरण ( घनश्याम कडू) 🔷🔶🔷🔶

न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र दामोदर म्हात्रे यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधत ग्रामपंचायतीच्या ५ टक्के दिव्यांग निधीतून ३ घरघंटी व इतरांस प्रत्येकी ७ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वाटप तसेच १५ टक्के मागासवर्गीय निधीमधून शालेय विद्यार्थ्यांना टॅब(मोबाईल) वाटप करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाचे शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता न्यू इंग्लिश स्कुल न्हावे येथे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत न्हावे व कर्मचारी वर्ग यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.