Press "Enter" to skip to content

चिंच खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

सिटी बेल लाइव्ह / आरोग्य कट्टा 🔷🔶🔷🔶

चिंचेचं नुसतं नाव काढलं तरी कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कोवळ्या तुरट, आंबट चिंचा मीठासोबत खाणे म्हणजे निव्वळ पर्वणीच. मात्र अशी ही तोंडाला पाणी सोडणारी चिंच आरोग्याच्या दृष्टीनेदेखील मानवी शरीरासाठी लाभदायक आहे. चला तर जाणून घेऊ फायदे….

चिंचेमध्ये व्हिटामिन बी, सी, कॅरोटिन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात. चिंचेचे सेवन केल्यास अन्न योग्य पचन होते. म्हणून ज्याना जेवण व्यवस्थित पचत नाही त्यांनी दररोज थोडी चिंच खा. चिंच खाल्ल्याने पाचन शक्ती मजबूत होते आणि पाचक प्रणाली योग्य प्रकारे कार्य करते.


चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती सुधरवण्यासाठी मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास अनेक आजारांचा धोका असतो. चिंच खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधरवण्यासाठी मदत होईल.

ज्याना वजन कमी करायची इच्छा आहे त्यानी थोड्या प्रमाणात चिंचेचे सेवन करा. चिंचेमुळे वजन कमी होण्यास मदत होते. चिंच खाल्ल्याने हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते. म्हणून, आपल्या आहारात चिंचेचा समावेश करा. जमल्यास आठवड्यातून एकदा तरी चिंच खा.


जास्त कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका असतो. चिंचेचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत मिळेल. प्रवासाच्या वेळी बर्‍याच वेळा अस्वस्थ वाटत आणि उलट्या होतात. अश्यावेळी तुम्ही चिंचेचे सेवन करा. चिंच खाल्ल्याने मनस्थिती सुधारण्यास मदत होते. आणि उलट्यांचा त्रास कमी होतो.


चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी, राइबोफ्लेविन आणि झिंक हे घटक असतात. जे केसांसाठी चांगले मानले जातात. चिंचेचे सेवन केल्याने केस अधिक मजबूत होतात. याशिवाय चिंचेमध्ये स्कीन फ्रेंडली घटकही असतात जे त्वचेसाठी पोषक असतात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.