Press "Enter" to skip to content

शिवतेज कामगार संघटनेच्या कामगारांचे गेट बंद आंदोलनाला यश

माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाने कामगारांच्या मागण्या झाल्या मान्य🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) 💠🌟💠🌟

जीडीएल कामगारांनी त्यांच्या मागण्यांना न्याय मिळत नसल्यामुळे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवतेज कामगार संघटनेमधील सर्व कामगारांनी गेट बंद आंदोलन सुरु केले होते. दोन दिवसा नंतर कामगारांचे संय्यमी आंदोलन, तसेच माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी दिलेला सल्ला, पर्ल फ्रेट प्रशासन व जीडीएल प्रशासन व्यवस्थापनाने कामगार हितासाठी दाखवलेली तत्परता या सर्वांच्या अथक प्रयत्नाने कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या.

सदर गेट बंद आंदोलन मागे घेऊन कामगारांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी स्वत: उपस्थित राहून पर्ल फ्रेट प्रशासन, जीडीएल प्रशासन आणि शिवतेज कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीला पर्ल फ्रेट प्रशासन आणि जीडीएल प्रशासन यांच्या मार्फत उत्तम प्रतिसाद देण्यात आला.

त्यामध्ये प्रामुख्याने २ मयत कामगारांच्या वारसांना १ सप्टेंबर पासून कामावर घेण्यात आले, ४ निवृत्त कामगारांच्या वारसांना ०१ ऑक्टोबर पासून कामावर घेण्याचे मान्य करण्यात आले, मयत व निवृत्त झाल्यापासून आतापर्यंतचा थकीत पगार मयताच्या व निवृत्त कामगारांच्या वारसांना देण्यात येईल, कोव्हीडचा ५ लाखांचा लाईफ इन्शुरन्स व २ लाखांचा मेडीक्लेम देण्याचे मान्य केले, कामगारांच्या वतीने प्रत्येक शिफ्टला येणारा सर्व काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. आदी मागण्यांचा समावेश आहे.

कामगार आणि प्रशासन यांनी एकत्रित राहून टीमवर्क म्हणून काम करण्याचा सल्ला माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी कामगारांना दिला. तसेच भविष्यात काम बंद करण्याची पुन्हा वेळ येणार नाही असे आश्वासन प्रशासनामार्फत देण्यात आले.

सर्व मागण्या पूर्ण झाल्याने कामगारांनी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांचे आभार मानले. यावेळी जिप सदस्य विजय भोईर, शिवतेज कामगार संघटनेचे महेंद्र सावंत, जीडीएल युनिटचे सर्व कामगार प्रतिनिधी, कामगार तर पर्ल फ्रेटचे प्रभाकर व जीडीएल सीएफएसचे मॅनेजर चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.