ॲड.कैलास मोरे यांची मागणी 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔷🔶🔶🔷
कर्जत एज्युकेशन सोसायटीचे असलेले इंग्लिश मिडियम स्कुल कडुन शिक्षण हक्क कायद्याचे (RTE) उल्लंघन करुन इमारत निधि व प्रवेश शुल्काच्या नावाखाली पैसे घेणा-या संस्थेची मान्यता रदद करा अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य उपाध्यक्ष ॲड. कैलास मोरे यांनी केली आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे कर्जत तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले की, RTE ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली आहे. RTE कायदयाअंतर्गत पुर्ण शिक्षण नर्सरी, ज्युनिअर केजी ते 8 वी पर्यंतचे इंग्लिश व मराठी माध्यमाचे शिक्षण मोफत कुठलेही शुल्क न घेता दिले पाहिजे. तसेच शिक्षण हक्क कायदयाअंतर्गत 25 टक्के आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी मोफत प्रवेश दिला पाहिजे.
असं असताना कर्जत मधील कर्जत एज्युकेशन सोसायटीचे असलेले इंग्लिश मिडियम स्कुल ने ज्या विदयार्थ्यांची पहिल्या लॉटरीत नावे आलेली आहेत त्या विदयार्थ्यांकडून त्यांच्या पालकांकडुन सदर शाळेने इमारत निधी तसेच प्रवेश शुल्काच्या नावाखाली रक्कम 25 हजार रुपये मागणी करून एकप्रकारे प्रवेश नाकारला आहे.
सदर संस्थेने शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 चे पुर्णपणे उल्लंघन केलेले आहे. तसेच मा.शिक्षणमंञी महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा सरकारी व खाजगी शाळांना शाळा सुरू होईपर्यंत कुठल्याही प्रकारची फि घेण्याची नाही असे आदेश दिलेले आहेत. परंतु त्यांचे आदेश सुद्धा सदर शाळेने पाळलेला नाही. सदरची बाब विद्यार्थ्यावर अन्यायकारक अशी आहे. हया संदर्भात आमच्याकडे अनेक पालकांनी तक्रारी केलेल्या आहेत असे ॲड. मोरे यांनी सांगितले.
दि.16.1.2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या शाळा पात्र विद्यार्ध्यांचे प्रवेश नाकारतील अशा शाळांची RTE मान्यता रदद करण्याची तरतुद आहे. RTE अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अनिवार्य आहे.असं असताना सदर शाळेने घेतलेला पवित्रा चुकीचा आहे. हयासंदर्भात आमचेकडे तसेच मा.शिक्षणाधिकारी पंचायत समिती कर्जत यांच्याकडे पालकांनी तक्रारी केलेल्या आहेत.मा.गटशिक्षणाधिकारी, कर्जत यांनी सुद्धा सदर शाळेला पत्र पाठवुन प्रवेश देण्यास सांगितले आहे. परंतु सदर शाळेने त्यांच्या पत्राला सुद्धा न जुमानता केराची टोपली दाखबिली आहे. हयासंदर्भात मा.गटशिक्षणाधिकारी कर्जत यांनी शिक्षणाधिकारी यांना सुद्धा दि.25 ऑगस्ट 2020 रोजी पत्र पाठवुन तक्रार करून सदर शाळेवर कारवाई करणेसाठी मार्गदर्शन मागितले आहे.परंतु मा.शिक्षणाधिकारी कार्यालयाने सुद्धा अदयाप काहिचं कारवाई केलेली नाही.
त्यामुळे सदर शाळेची दादागिरी अजुन वाढलेली आहे.त्यामुळे सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे काल नायब तहसीलदार संजय भालेराव यांना अँड.कैलास मोरे यांनी निवेदन दिले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी हरिश्चंद्र यादव, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, सरचिटणीस प्रदीप ढोले, युवा सरचिटणीस राहुल गायकवाड, शहर अध्यक्ष गणेश मोरे, विकास गवळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
दि.16 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार कर्जत एज्युकेशन सोसायटीचे असलेले इंग्लिश मिडियम स्कुल ची RTE कायदया अंतर्गत मान्यता रद्द करण्यात यावी. जर प्रशासनाने आमच्या निवेदनाची कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यास आम्हाला आपल्याविरूद्ध विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल. त्यामुळे निर्माण होणा-या परिस्थीतीस आपण सर्वस्वी जबादार रहाल असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य उपाध्यक्ष अँड.कैलास मोरे यांनी दिलेला आहे.सदर निवेदन प्रति शिक्षणमंत्री मा.वर्षा गायकवाड, मा.जिल्हाधिकारी, मा.गटविकास यांना पाठवण्यात आल्या आहेत.






Be First to Comment