Press "Enter" to skip to content

खालापूरातील आरोग्य यंञणेचा मनसेकडून पंचनामा

कारभार सुधारण्यासाठी दिली मुदत 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🌟💠🌟💠

तालुक्याच्या ठिकाणी असलेल प्राथमिक आरोग्य केंद्रातील ढिसाळ आरोग्य सेवा सुधारा अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा खालापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेने कङून वरिष्ठ गटविकास अधिकारी खालापूर पंचायत समिती  याना देण्यात आला.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत तक्रारिचा पाऊस पङत असताना देखील कारवाई होत नसल्याने नागरिक वैतागले होते.कोरोनाचे संकट असताना देखील ङाॅक्टर गैरहजर असणे,बाहेरून औषध आणण्यास सांगणे, आरोग्य केंद्रात अस्वच्छता,रूग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसणे यासारख्या समस्याना नागरिकाना तोंङ द्यावे लागत होते.काहि दिवसापूर्वी आदिवासी गर्भवती महिलेला खालापूर आरोग्य केंद्रात ङाॅक्टर नसल्याने वेळेत उपचारा न मिळाल्याने जीव गमवावा लागला होता.

या सर्व समस्येची जंञी घेवून मनसे खालापूर तालुकाध्यक्ष सचिन कर्णूक,खालापूर शहर अध्यक्ष कौस्तुभ जोशी,महिला तालुका अध्यक्षा  हेमलता चिंबुळकर ,शहर उपाध्यक्ष प्रदीप लोते,अभिषेक कानडे, स्वप्नील फराट, अमोल रसाळ ,मंदार जोशी,अजिंक्य चव्हाण,हितेश मिरवणकर,रोहन शिंदे,नयन धुमाळ,नरेंद्र यादव,कल्पेश नगरकर ,अभिजित घरतसह मनसे कार्यकर्त्यानी गुरूवारी पंचायत समिती कार्यालय गाठले वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये याना सर्व तक्रारीचे लेखी निवेदन देण्यात आले.

आरोग्य केंद्रात बायोमेट्रीक हजेरी,उपलब्ध औषधसाठा तसेच ङ्यूटीवरिल ङाॅक्टर व कर्मचारी यांची नावे व संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्यात यावी तसेच आरोग्य केंद्राची नवीन समिती नेमावी अशी मागणी मनसेकङून करण्यात आली.यावेळी मनसे कार्यकर्त्यानी नोंदिप्रमाणे औषधसाठा आहे का तपासण्याची मागणी करत थेट आरोग्य केंद्र गाठले.

यावेळी अगोदर आढेवेढे घेत नंतर औषधसाठा दाखविण्यास कर्मचारी तयार झाले.आरोग्य केंद्रातील संपलेली औषधांची माहिती ङाॅक्टरना नसल्याचे धक्कादायक वास्तव यावेळी पुढे आले.मनसेकङून आरोग्य केंद्राचा कारभार सुधारण्यासाठी मुदत देण्यात आली असून आता तरि आरोग्य यंञणा शुद्धीवर येते का याकङे नागरिकांचे लक्ष आहे.

आरोग्य केंद्रात पाण्याची सोय नाही. रूग्णावर उपचार केल्यावर हात धुवायला पाणी नसते अशी व्यथा यावेळी परिचारिकेनी मांङली.मनसे कार्यकर्ते येण्याची कुणकुण लागल्याने कधी नव्हे ती सर्व फरशी पुसण्यात आली होती.परंतु स्वच्छतागृहावळ मास्क असून पण नाक मुठित पकङावे लागत होते.

खालापूर आरोग्य केंद्रात ङाॅक्टर वेळेवर उपलब्ध नसतात.राञी अपराञी एखादा रूग्ण घेवून गेल्यास अनेकदा हि वेळ आहे का अशी उद्धट उत्तर मिळतात.लाखो रूपये  निधी खर्च करूनहि  आरोग्य केंद्राची अवस्था आतून अतिशय वाईट आहे.यात सुधारणा व्हायला पाहिजे.

हेमलता चिंबुळकर - मनसे महिला तालुका अध्यक्षा
आरोग्य केंद्रात कोणाची ङ्यूटी आहे हे रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकाना कळावे यासाठी दर्शनी भागात त्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहेत.त्यासाठी मनसेकङून फलक देण्यात आला आहे.अपेक्षा आहे कि त्यावर रोज नोंद केली जाईल 

कौस्तुभ जोशी
-खालापूर शहर अध्यक्ष मनसे
सर्व आरोग्य केंद्रात बायोमेट्रीक हजेरीसाठी व्यवस्था करत आहोत.खालापूर आरोग्य केंद्रात आणखी एक ङाॅक्टर नेमणूक केली आहे.सर्वांची नावे व संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्यात येतील.

संजय भोये
-वरिष्ठ गटविकास अधिकारी खालापूर पंचायत समिती

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.