Press "Enter" to skip to content

मुंबई-गोवा महामार्गावर जीव घेणे खड्डे : खड्डयात हरवले रस्ते


सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔷🔶🔷🔶


मुंबई-गोवा महामार्गावर जागोजागी पडलेल्या प्रचंड मोठया प्रमाणात खड्डयांमुळे रस्त्यात खड्डे कि खड्डयात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली असुन या खड्डयांमुळे प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड ते नागोठणे दरम्यान रस्त्याला पडलेल्या प्रचंड मोठया प्रमाणात खड्डयांमुळे रस्त्यात खड्डे कि खड्डयात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली असुन या खड्डयातुन वाट काढतांना प्रवासी वर्गाची पुर्णपणे दमछाक‌ झाली आहे.

पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून चाकरमणी मुंबई कडे निघाले असता या महामार्गावर पकडलेल्या प्रचंड खड्डयांमुळे यातून मार्ग काढतांना तारांबळ उडाली. यामुळे ठिकठिकाणी वाहतुक कोंडी हि निर्माण झाली.
मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणे अवश्यक होतेे.यामुळे पत्रकारांनी रस्ता रोको हि केला.या नंतर पनवेल ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरणाच्या कामाला मंजूरी मिळाली व या महामार्गाचे काम सुरू केले.परंतुु या कामाला दहा वर्षे पुर्ण झाली तरी या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही.

अनेक ठेकेदारांनी कामेही केली.परंतुु या रस्त्याचे काम पूर्ण होईना? व खड्डयांमुळे मुक्ती मिळेना.रस्ते वाहतुक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या महामार्गाची पाहणी करुन मार्च२०१९ पर्यत या चौपदरीकरणाचे काम पुर्ण होईल असे सांगितले होते.परंतुु अद्याप हे काम पुर्ण झाले नाही.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरणाचे काम वर्षांला फक्त १० कि.मी.चे काम पुर्ण केले असते तरी या महामार्गाचे काम अद्याप पुर्ण झाले असते परंतुु नियोजन शुन्य यामुळे या महामार्गाचे काम केव्हा पुर्ण होईल याची खात्री देता येत नाही.यामुळे प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन या पासुन लवकरच सुटका होण्यासाठी या महामार्गाचे काम या वर्षी तरी पुर्ण करावे अशी मागणी प्रवाशी वर्गातुन केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.