आत्तापर्यंत मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणा-या 218 जणांवर कारवाई 🔷🔶🔷🔶
83 हजार 600 रुपये दंड वसूल 🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🌟💠🌟💠
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेले नियम धाब्यावर बसविणाऱ्या ग्राहक व विक्रेत्यांवर काल कर्जत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली.
कर्जत बाजारपेठेत मास्क न लावता फिरणे, दुकानात गेल्यावर विक्रेते ग्राहकांना सॅनिटायझर न करणे, सामाजिक अंतर न पाळणे , टपऱ्यावरं गर्दी करणे ,आदींबाबत कडक निर्बंध मा . जिल्हाधिकारी यांनी आणले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे यासाठी दिलेले नियम पाळा , याबाबत वारंवार सूचना देऊनही तसेच फलक लावून नागरिक त्याचप्रमाणे विक्रेते कानाडोळा करतात. याबाबत नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दंडात्मक कारवाई केली .
कर्जत तालुक्यातील तसेच शहरातील कोरोनाची संख्या वाढत आहे, यामध्ये अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत, यातून बोध न घेता अनेक जण बिनाकामचे बाजार पेठेत फिरत आहेत, तसेच खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यावेळी अनेकजण मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे आदी नियमांचे पालन करत नाहीत. ही बाब कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या लक्षात आली आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्याप्रमाणे काल कर्जत बाजारपेठेत मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील स्वतः तसेच कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र, गोसावी, सचिन सोनावणे , नगर अभियंता मनीष गायकवाड , सहाय्यक अभियंता सारिका कुंभार , सहाय्यक. नगररचनाकार लक्ष्मण माने, सुरेश खैरे, नरेंद्र गजभिये , प्रभाकर कोचूरे, अशोक भालेराव, सुनील लाड, अरविंद नातू , स्वच्छता निरीक्षक सुदाम म्हसे, बापू बहिरम, मुकादम प्रदीप मोरे , निलेश निकाळजे, दिलीप गायकवाड, अविनाश पवार आदी अधिकारी व कर्मचारी यांनी कारवाई केली.
आज पर्यत नागरिक, ग्राहक, विक्रेते अश्या 218 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. असून 83 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.काल 17 नागरिक व दुकानदार यांच्याकडून 4700 रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. दंडाची रक्कम न देणाऱ्यास पोलीसाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी सांगितलेले नियमाचे पालन न पाळल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्जत नगर परिषदेच्या दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.अशी माहिती मुख्याधिकारी डॉ .पंकज पाटील यांनी दिली.






Be First to Comment