स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत देण्यात आली रुग्णवाहिका 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔶🔷🔷🔶
स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या निधी 2020-21कार्यक्रमा अंतर्गत आज दि.3 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे रुग्णवाहीका लोकार्पण करण्यात आली, आमदार महेंद्र थोरवे यांनी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.
अत्यावश्यक सोयी सुविधांनी उपलब्ध असलेली रुग्णवाहिका आज लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली, याचा फायदा कर्जत मधील सर्व सामान्य जनतेला होणार आहे. आज कोरोना सारख्या आजाराची परिस्तिथी पाहता रुग्णांना पुढील उपचाराकरिता मुंबईला अथवा इतर ठिकाणी नेण्याकरिता याचा खूप फायदा होणार आहे.
या लोकार्पण प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, राजिप माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील,शिवराम बदे, दशरथ भगत, दिलीप ताम्हाणे, मोहन ओसवाल, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, प्रसाद डेरवणकर, विवेक दांडेकर,राहुल डाळिंबकर,सायली शहसने, शरद ठाणगे , उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे, मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील आदी सह नागरिक उपस्थित होते.






Be First to Comment