कोरोना विषाणू संसर्ग काळात वैद्यकीय अधीक्षकांचे दुर्लक्ष ! 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे 🔶🔷🔶🔷
कर्जत उपजिल्हा रुग्णालय अनेक गैरसोईमुळे व समस्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे . याविरोधात अनेक पक्ष , संघटनांनी आवाज उठविला अनेक मंत्री येऊन गेले , मात्र रुग्णालया विरोधातील तक्रारी नेहमीच कचऱ्याच्या डब्ब्यात गेल्या . कर्जतकरांच्या सुचनेकडे येथील वैद्यकीय अधिक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अनेक रुग्णांच्या जीवावर बेतण्याच्या घटना येथे घडलेल्या असताना आत्ता तर कहरच झाला . ऐन कोरोना विषाणू काळ पूर्वीपासून ते आजपर्यंत येथील रुग्णवाहिका बंद अवस्थेत आहे .
त्यामुळे या बंद अवस्थेत असलेल्या रुग्णवाहिका दुरुस्ती कामी दुर्लक्ष करणाऱ्या वैद्यकीय अधिक्षकांवर कारवाई व्हावी , अशी मागणी नागरिकांमधून होत आहे . कोरोना विषाणू संसर्ग काळात बाधित रुग्णांना पुढील उपचारासाठी इच्छित स्थळी पोहचण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने अनेकांना जीवावर बेतले .
कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची हक्काची शासनाने दिलेली रुग्णवाहिका ( एम . एच . 46 के 5038 ) आहे . मात्र गेल्या एक वर्षांपासून ती बंद अवस्थेत आहे . येथे आलेले रुग्ण अति आजारी असल्यास त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल , नवी मुंबई , मुंबई किंवा ईतर इच्छित स्थळी तातडीच्या उपचारासाठी या रुग्णवाहिकेचा वापर होतो . तर आता या कोरोना काळात या रुग्णवाहिकेचा वापर कोरोना बाधित रुग्णासाठी देवदूतासमान होती .

मात्र अनेकांच्या जीवावर बेतण्याच्या घटना येथे घडल्या असताना ही हक्काची रुग्णवाहिका येथील वैद्यकीय अधीक्षकांनी बंद अवस्थेत ठेवून कर्जतकरांना मृत्यूच्या उंबरठ्यावर ठेवले होते .
एक वर्षांपासून बंद पडलेल्या या रुग्णवाहिकेची आत्ता दयनीय अवस्था झाली आहे . तर १०८ व १०२ नंबरच्या रुग्णवाहिकेतून कोरोना बाधित रुग्ण इतर ठिकाणी नेण्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आदेशाने मनाई आहे . १०२ ही रुग्णवाहिका गरोदर मातांच्या सेवेसाठी आहे , तर १०८ नंबरची रुग्णवाहिका बेभरोशी असल्याची अनेकांची तक्रार आहे . त्यामुळे खितपत पडलेल्या रुग्णवाहिकेची जबाबदारी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांची असल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची मागणी नागरिकांमधून व छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे .






Be First to Comment