सिटी बेल लाइव्ह / रोहा (नंदकुमार मरवडे/केशव म्हस्के) 🔶🔷🔷🔶
रोहा तालुक्यातील कोरोनाचे प्रादुर्भाव वाढत असताना देखील रुग्ण बरे होण्याचे ही प्रमाण वाढते असून कोरोना महामारित तालुक्यातील खारगाव ग्राम पंचायत हद्दीमधील मौजे खारी येथील माजी पोलीस पाटील हरिश्चंद्र मारुती मालुसरे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय रोहा येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅब दि. १८ऑगस्ट रोजी तपासणी साठी पाठविला होता त्याचे रिपोर्ट त्याच दिवशी प्राप्त झाले परंतु त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने हरिश्चंद्र मालुसरे यांना अधिक उपचाराकरिता पुणे येथील सिम्बॉयसिस हॉस्पिटल येथे तातडीने हलविण्यात आले. तब्बल १४ दिवसांच्या नियमित उपचारानंतर ते बरे होऊन घरी परतले.
याप्रसंगी खारी – काजुवाडी गाव च्या वतीने अध्यक्ष दत्तात्रेय काळे, उपसरपंच नितीन मालुसरे, महादेव मुसळे,हरिश्चंद्र खरीवले,सतेज आपणकर,राजेश मुसळे,मंगेश कदम आदी ग्रामस्थ- गुरूनगर रहिवासी सदस्यांच्या उपस्थिती मध्ये त्यांना पुष्प मालिका अर्पण करून माजी पोलीस पाटील यांचे स्वागत करताना भावी निरोगी,सुदृढ,सशक्त आयुष्यासाठी ग्राम दैवताला प्रार्थना करीत सर्वांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या .
Be First to Comment