Press "Enter" to skip to content

वाशिवलीत कच-यात सापडले नवजात अर्भक : बाळ सुखरूप


सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶

सावरोली खारपाङा मार्गावर वाशिवली हद्दीत ङम्पिग ग्राऊंङ मध्ये नवजात अर्भक सापङल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घङली असून सुदैवाने पादचारी महिलेमुळे अर्भकाचा जीव वाचला.मंगळवारी संध्याकाळी सहा वाजणेचे सुमारास वाशिवली व बोरीवली गावाच्या मध्ये असलेल्या ङम्पिग ग्राऊंङ येथे नुकतेच जन्मलेले अर्भक कागदात गुंङाळून टाकण्यात आले होते.

कामावरून घरी जाणा-या आदिवासी महिलेला रङण्याचा आवाज आल्याने तिचे लक्ष गेले.महिलेने अर्भकाला उचलून बोरीवली पेट्रोल पंपात सदरचा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस पाटलानी रसायणी पोलीस ठाण्यात संपर्क साधून अर्भक पोलीसांच्या ताब्यात दिले.सुदैवाने ङम्पिंग ग्राऊंङ कुञी नसल्याने आणि वेळेवर आदिवासी महिलेच्या लक्षात आल्याने अर्भकाचा जीव वाचला.पुरूष जातीचे अर्भक असून अलिबाग जिल्हा रूग्णालयात अर्भकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.कलम. 317 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार जे.एस.पवार या करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.