Press "Enter" to skip to content

पावसाची सर आली धावून, नडोदे – कलोते रस्त्यावरील डांबर गेली वाहून

रस्त्यावर झाले तलावाचे स्वरूप 🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव : पाताळगंगा 🔶🔷🔶🔷

 दोन वर्षापूर्वी नडोदे – कलोते या रस्त्याचे काम पूर्ण झाले.मात्र पावसाच्या सरीमुळे रस्त्यावरील डांबर वाहून या रस्त्याची दुरावस्था निर्माण झाले. यामुळे ठीक – ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे आपघाताला निमंत्रण देत आहे. पावसामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप येत असून, या मार्गावरून प्रवास करीत असलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शिवाय या ठिकाणी फॉर्माहाउस असल्यामुळे हे पाणी रस्त्यावर   मोठया प्रमाणात जमा होत असल्यामुळे या ठिकाणी तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे.यामुळे वाहन चालकांस वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे.
               

रस्त्याची झालेली दुरवस्था आणी मध्यभागी पडलेल्या खाद्यामुळे  वाहन चालकांस वाहन चालविताना किरकोळ अपघात घडत  आहेत .गेले अनेक वर्ष या रस्त्याची दुरावस्था निर्माण झाली होती.मात्र पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून झलाकी मिळाली.मात्र काही महिन्यातच रस्त्याचे स्वरूप बदलून गेल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहे.
        

  तालुक्यातील रस्त्याला लागलेले ग्रहण सुटत नाही हिच स्थिती गावातील जोडणा-या रस्त्याची झाली आहे.शिवाय रस्त्याचे काम दर्जेदार होत नसून, केवळ नागरिकांची समजूत काढावी म्हणून केले जात असल्याची भावना या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक व्यक्त करीत आहे.तालूक्यातील गावांना जोडणारे रस्ते लवकर होतच नाही.शिवाय ते उत्तम पणे करीत नसल्यामुळे कैवल नैसर्गिक आपत्ती मुळे होत असल्याचे कारण पुढे केले जात आहे.यामुळे रस्ते चांगले केव्हा होणार २०१७  मध्ये मे महिन्यात रस्त्याचे काम झाले  मात्र पावसाळा सुरु होताच या रस्त्याला ग्रहण लागले असल्यामुळे ह्या रस्त्याची दुरावस्था निर्माण झाली आहे. हा खोपोली जाण्यासाठी मार्ग नजदिक असल्यामुळे या मार्गावरून शेकडो हुन अधिक प्रवास करीत आहे.परिणामी या रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे आणि तलावामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.