सिटी बेल लाइव्ह / मुंबई 🔶🔷🔷🔶
भाजपा नेते आणि महाराष्ट्रातील माजी आमदार सरदार तारासिंह यांचे दुःखद निधन झाले आहे. महाराष्ट्र भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटर वरून तारा सिंह यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे.
दरम्यान, ‘मेरा काम ही मेरी पहचान”आयुष्याच्या शेवटाच्या क्षणापर्यंत या त्यांच्या ब्रीदवाक्याला साजेसे कार्य करत राहणारे नगरसेवक ते आमदार अशी जवळजवळ ४० वर्ष राजकीय कारकीर्द गाजवणारे आमदार सरदार तारासिंह यांचे दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांना चिरशांती देवो हीच प्रार्थना’ असं त्यांनी ट्वीट केले आहे.
सरदार तारा सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात मुंबई महानगर पालिकेतून झाली होती.त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे.
सरदार तारासिंह हे महाराष्ट्राचे माजी आमदार होते. मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदार संघाचे त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व केले होते.मागील निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. 2018 साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेड च्या सचखंड गुरुद्वारा बोर्ड च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला होता.






Be First to Comment