Press "Enter" to skip to content

वाढीव वीज बिले रद्द करावीत : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड ) 🔶🔷🔷🔶

मार्च ते जुलै या लॉक डाऊनच्या काळात वीज ग्राहकांना आलेली वाढीव बिले कमी करावीत. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्ट मंडळ कर्जतच्या उप कार्यकारी अभियंत्यांना भेटले व त्यांना निवेदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज दि.2 सप्टेंबर रोजी मार्च ते जुलै या लॉक डाऊनच्या कालावधीत महागाई, बेरोजगारीने त्रस्त असलेल्या नागरिकांना आलेल्या वाढीव बिल कमी करण्या संदर्भात महा वितरणाच्या कार्यालयात जाऊन उप कार्यकारी अभियंता आनंद घुले यांना भेटून निवेदन दिले व यांच्या समवेत शिष्ट मंडळाने चर्चा केली.

सदर चर्चेत अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला. सदर बिले तपासून त्यातील त्रुटी शोधून नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच आलेली चालू बिल भरण्यासाठी 3 टप्प्यात भरण्याची सूट द्यावी. तोपर्यंत वीजपुरवठा खंडित करू नये. अशा मागण्या ठेवण्यात आल्या व त्या मागण्या घुले यांनी मान्य केल्या. तरीही या बाबतीत नागरिकांचे समाधान झाले नाही तर पुढे पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असेही सांगण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष नंदू लाड, जेष्ठ नेते तानाजी चव्हाण, तालुका युवक अध्यक्ष सागर शेळके, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, शहर युवक अध्यक्ष सोमनाथ पालकर, युवा कार्यकर्ते दशरथ जाधव, रघुनाथ ठाकरे, मनोज लाड, शशिकांत लाड, प्रवीण लाड,महेश लाड, संतोष लाड, भरत बामणे, वैभव लाड, सौरभ लाड, मनीष लाड आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.