माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्यंप्रणालीवर दाखविला विश्वास 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / उरण (घनश्याम कडू) 💠🌟💠🌟
माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या कार्यंप्रणालीवर प्रेरीत होवून युवा प्रकल्पग्रस्तांचे नेते गौरव म्हात्रे यांनी आपल्या गव्हाण-कोपर विभागातील शेकडो कार्यकर्त्यांचा समवेत माजी आमदार मनोहर भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी भगवा झेंडा तसेच शिवबंधन बांधून स्वागत करण्यात आले.

माजी आमदार मनोहर भोईर यांनी उरण विधानसभा हद्दीतील केलेली विकासकामे तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा ध्यास, बघता इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेकडे वाढत आहे. यावेळी गौरव म्हात्रे यांच्यासह अरुण म्हात्रे, देवेंद्र म्हात्रे, किशोर म्हात्रे, ओमकार म्हात्रे, सम्राट घरत, महेश पाटील, समाधान भोईर, अक्षय म्हात्रे, नरेंद्र म्हात्रे, नितेश घरत, प्रदिप म्हात्रे, दर्शन मोकळ, सनी भोईर, प्रविण पाटील, धनराज मोकळ, प्रतिक घरत, इम्रान शेख, अक्षय ठाकूर, नितेश ठाकूर, नरहरी म्हात्रे, राहुल भोईर, रोहन घरत, अभिषेक ठाकूर आदीसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर विश्र्वास ठेवून जाहीर पक्षप्रवेश केला.
गौरव म्हात्रे यांनी प्रवेश करताच माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी त्यांच्यावर पनवेल युवाअधिकारी ग्रामीण (पश्चिम) पदी निवड करून नियुक्त पत्र दिले. कार्यकर्त्यांचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी स्वागत करुन शिवसेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे सांगत आपल्या विश्वासाला कधीही तडा जावून देणार नसल्याचे प्रवेशकर्त्यांना सांगितले.

याप्रसंगी रोहिदास पाटील भा.वि.से.जिल्हासंघटक, नितेश पाटील युवासेना विधानसभा अधिकारी, केवळ माळी युवा तालुकाधिकारी (ग्रामीण) पनवेल, मनोज घरत उलवे नोड शहरप्रमुख, अरविंद पाटील उपशहरप्रमुख, सुदिप ठाकूर युवाधिकारी, अनिल घरत शाखाप्रमुख, शेखर पाटील विनोद पाटील शाखाप्रमुख से.१७, संतोष घरत सल्लागार कोपर, अशोक सर अवजड वाहतूक सेना, प्रणित पाटील युवाधिकारी, प्रशांत पाटील युवसेना चिरनेर युवाधिकारी आदी उपस्थित होते.






Be First to Comment