Press "Enter" to skip to content

माजी केंद्रप्रमुख सदाशिव वाघ यांचे कोरोनाने निधन

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶

शहरातील साबाई नगरमध्ये राहणारे सदाशिव हिरामण वाघ यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले.गेले पंधरा दिवस कोरोनाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेवून शिक्षक आणि केंद्रप्रमुख पदापर्यंत सदाशिव वाघ यानी काम केल होत.पेपर टाकणे,हाॅटेल मध्ये वेटर तसेच पङेल ते काम करत जिद्दीने स्वतःच्या पायावर ऊभे राहिलेले वाघ गुरूजीनी अनेक विद्यार्थी घङविले.त्यांची मुल देखील उच्च शिक्षण घेवून स्थिरस्थावर आहेत.त्यांच्या पत्नी शोभा यांचा महत्वाचा वाटा गुरूजींच्या यशस्वी प्रवासात होता.

निवृत्तीनंतर खालापूरातील सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असत.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,एक मुलगी,जावई ,सुना नातवंङे असा परिवार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.