नागरिकांकडून शासकिय नियम न पाळणाऱ्या भंगार वाल्यांवर कारवाई करण्याची शासनाकडे मागणी 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी 💠🌟💠🌟
सध्या राज्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्याची माहिती प्रसार माध्यमातून दररोज प्रसिद्ध होताना दिसत आहे. उरण तालुक्यात जरी ही आकडेवारी कमी असलीतरी आत्ता पर्यंत मृतांची संख्या६५ आहे हे जरी असले तरी काही महाशय विना मास्क ने फिरताना दिसत आहेत.
काहीजणांचा असा समज आहे की लॉंकडाउन शिथिल झाला आत्ता सर्व नियम शिथिल झाले. या भ्रमात राहून काही महाशय बिनधास्त विना मास्क ने फिरताना दिसत आहेत. याचाच भाग उरण शहरात मास्क न लावता गल्ली गल्ली तून नागरिकांच्या घरोघरी जावून मास्क न लावता भंगार जमा करणारे भंगार वाले फिरत आहेत. यांना समज कोन देणार, असा सवाल उरण शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






Be First to Comment