Press "Enter" to skip to content

पाली मध्ये कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज

कोणीही आजार अंगावर काढू नका; उपचारासाठी स्वतःहून पुढे या : पाली तहसीलदारांचे घर भेटीद्वारे नागरिकांना आवाहन 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷

सुधागड तालुक्यात कोरोना संसर्गाचा झपाट्याने फैलाव होताना दिसतोय. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून स्पेशल टास्क टीमद्वारे घराघरात पोहचून  आरोग्य तपासणी केली जात आहे.  विशेष म्हणजे या उपक्रमात स्वतः तहसीलदार सहभागी झाले असून नागरिकांशी संवाद साधून आरोग्याची  काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत. कोणीही आजार अंगावर काढू नका, कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, उपचारासाठी पुढे या असे आवाहन पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार  यांनी सुधागडवासीय जनतेला केले आहे. 

कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा पाली तहसीलदारांनी यावेळी विश्वास व्यक्त केला आहे. तहसीलदार रायन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना नियंत्रणासाठी सर्वत्र पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. येथील सामाजिक सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य व समनव्याने काम केले जात आहे. कोव्हिडं सेंटर वावलोली येथे जाऊन तहसीलदार रुग्णांच्या  तब्बेतीबाबत आपुलकीने विचारपूस करीत आहेत. व त्यांना आधार देत आहेत. दरम्यान पाली तहसीलदार रायन्नावार यांनी कोरोनाच्या पाश्वभूमीवर महत्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन केले आहे. 

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, तलाठी ग्रामसेवक यांच्या सोबत चर्चा करून गावांमध्ये आशा वर्कर, शिक्षक यांच्या माध्यमातून पल्स ऑक्सीमीटर व टेम्परेचर गन ने सर्वांची आरोग्य तपासणी करून घ्यायची आहे. यामध्ये आजारी पेशंट व त्यांच्या कुटुंबीयांना Qurantine करणे अतिशय आवश्यक आहे .आजारी पेशंट  कोव्हीड 19 तपासणी तात्काळ करून घ्यावी .कोणीही आजार अंगावर काढणार नाही याची दक्षता घ्या असे आवाहन दिलीप रायण्णावार यांनी आज केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.