Press "Enter" to skip to content

रायगडचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा कर्जत दौरा

पाली भूतीवली धरणातील पाण्याचा वापर निदान पिण्यासाठी व्हावा : आमदार रविंद्र चव्हाण 🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔶🔷🔷🔶


भारतीय जनता पक्षाचे कोकण प्रभारी रायगडचे माजी पालकमंत्री हे धावत्या कर्जत दौऱ्यावर आले होते. त्यांनी विविध कार्यकर्त्यांच्या व पदाधिकारी यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले. व कर्जत येथील भाजप पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

दरम्यान आपल्या दौऱ्यात आमदार चव्हाण यांनी पाली भूतीवली धरण प्रकल्पाची पाहणी केली. भाजपचे किरण ठाकरे व तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी या धरणात पाण्याचा मुबलक साठा असून त्याचे पाणी टंचाईग्रस्त गावास पिण्यास मिळावे यासाठी पाठपुरावा करावा अशा आशयाचे पत्र जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले होते. त्याची दखल घेऊन श्री चव्हाण यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली.

हे धरण बांधताना याचा उद्देश हा शेतीच्या पाण्यासाठी होता परंतु तत्कालीन शासनाकडून कालव्याच्या जमिनीचे अधिग्रहण झाले नाही. आता या धरणात मुबलक पाणी साठा असून येत्या काळात भाजपची भूमिका हे पाणी परिसरातील गावांना पिण्यास मिळावे अशी राहील. यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न भारतीय जनता पक्ष करेल. शेजारी भरलेले धरण असताना ग्रामीण भागातील स्त्रीयांची उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण होणे यापेक्षा दुर्दैव ते काय? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे. मी रायगडचा पालकमंत्री असताना जिल्ह्यातील सर्व धरणांच्या बाबत तीन वेळा आढावा बैठकी घेतल्या होत्या व त्यातल्या नागरी समस्यांचे अवलोकन केले असून त्याविषयी काम करण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकारी यांना दिल्या आहेत असे चव्हाण यांनी सांगितलं.

कर्जत मध्ये आमदार चव्हाण यांनी विविध पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन केले. चव्हाण यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, युवा नेते किरण ठाकरे, सरचिटणीस पंकज पाटील व राजेश भगत, भाजयुमो चे प्रदेश सचिव हृषीकेश जोशी, नितीन कांदळगावकर, प्रकाश पेमारे, महिला आघाडीच्या बिनीता घुमरे, नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका विशाखा जिनगिरे, सुषमा ढाकणे यासह बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.