Press "Enter" to skip to content

उरण पूर्व भागात दहा दिवसाच्या बाप्पाला निरोप

बाप्पाला निरोप देताना गणेश भक्ताना अश्रु आवरणे अशक्य

सिटी बेल लाइव्ह / विकास पाटील / उरण  🔶🔷🔶🔷

गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या”,”पायी हळू हळू चाला,मुखाने हरीनाम घ्या”अशा जयघोषात-उरण पुर्व विभागात दहा दिवसाचे गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.तर कोरोना महामारीचा वाढत चाललेला प्रकोप पाहता विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांनी सोशल डिस्टन्सिंग व कायदा सुव्यवस्थेचे पालन करुन “बाप्पा  कोरोनापासून सर्वांची लवकरच सुटका कर”अशाप्रकारचे साकडे विसर्जनाच्या वेळी भक्तांनी श्री.गणेशाला घातले.

गणेशोत्सवास प्रारंभ होण्यापूर्वी दोन तीन दिवसापूर्वीच पावसाने मुसळधार स्वरूपात बरसायला सुरूवात केली होती.तर गणेश चतुर्थीच्या दिवशीही सकाळपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसतच राहिल्याने गणेश भक्तांचा हिरमोड झाला. तर आज दहा दिवसाच्या गणपती उत्सवात पावसाने उघडीप दिल्याने गणेश भक्तांना गणेश उत्सवाचा आनंद लुटता आला. विसर्जनाच्या आदल्या दिवशी पाऊस पडत होता पण विसर्जनाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने गणेश भक्तांचा आनंद गगनात मावत नव्हता.

मुसळधार पाऊस व कोरोना महिमारीचा वाढत चाललेला प्रकोप या पार्श्वभूमीवरही गणेश भक्तांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता.
उरण पूर्व  विभागातील विविध गावातील घराघरात मोठ्या संख्येने गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली होती त्यात दहा दिवसाच्या गणपतींचीही संख्या मोठी असल्याने विसर्जनाच्या वेळी रस्त्यावय व विसर्जनाच्या ठिकाणी फार मोठी गणेश भक्त व भगिनींची गर्दी दिसून येत होती.विसर्जनाच्या वेळी सामाजिक अंतर ठेवून बाप्पाचे विसर्जन करता यावे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने काही अंतराने बाप्पाचे विसर्जन करण्यात यावे याचे नियोजन केले होते त्यामुळे गणेश भक्तांचे कोरोनापासून परावृत्त केले होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.