Press "Enter" to skip to content

प्रहार जनशक्ती पक्षाचे विद्युत महामंडळाला पेणच्या समस्येंबाबत निवेदन

सर्व्हे करून समस्या सोडवण्यात येतील – उमाकांत सकपाळे

सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार) 🔶🔷🔷🔶

पेण शहरातील विविध विद्युत समस्या महामंडळाने त्वरित सोडवाव्यात यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने विद्युत महामंडळ अधिकारि सकपाळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनाद्वारे अंडरग्राऊंड डीपीचे बॉक्स तसेच उघडे असणारे फेस बॉक्स या दोन धोकादायक गोष्टी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे चक्रीवादळाच्या काळात उन्मळून पडलेले पोल अर्धवट कटिंग करण्यात आल्याने त्यामुळे देखील अपघात होण्याची शक्यता असल्याने हे पोल पूर्णपणे कट करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने संतोष गवस (जिल्हाध्यक्ष रायगड) ,सचिन नाकते( उप जिल्हाध्यक्ष),काशिनाथ ठाकूर (जिल्हा सरचिटणीस रायगड),सुलतान साटी विधान सभा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली आहे.

तर याबाबत पेण विद्युत मंडळाचे अधिकारी उमाकांत सकपाळे यांनी या समस्यांचा पूर्णपणे सर्व्हे करून डीपीचे बॉक्स बसविण्यात येतील तसेच पोल देखील पूर्णपणे कट करण्यात येतील असे सांगितले.यावेळी रोहित शिंदे प्रहार जनशक्ती पक्ष पेण शहर अध्यक्ष हर्षल प्रकाश मोकाशी,प्रहार जनशक्ती पक्ष पेण शहर उपाध्यक्ष हे उपस्थित होते.


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.