सिटी बेल लाइव्ह / (रामचंद्र घोडमोडे- श्रीवर्धन) 🔷🔶🔷🔶
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच लाडक्या गणरायाचा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला .राज्यात कोरोना संसर्गजन्य वातावरण असल्यामुळे श्रीवर्धन पोलीस व नगरपालिका प्रशासन गणेशोत्सवासाठी जाणीवपूर्वक सज्ज होती.
यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळत या गणेशोत्सवाची सांगता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करणे हे पोलीस प्रशासन व नगरपरिषद यंत्रणेसमोर आवाहन होते . त्यासाठी यंत्रणना सज्ज होती. महत्वाचं म्हणजे श्रीवर्धन तालुका निसर्गमय असल्याने प्रत्येक गावाजवळ नैसर्गिक वाहते झरे व अफाट समुद्र किनारा असल्याने विसर्जनासाठी कुठे लांब जाण्याची गरज भासत नाही.
राज्यांवर असलेले कोरोनाचे संकट पाहून नागरिकांनीही पोलीस प्रशासन व, नगरपालिकेने दिलेल्या सोशल डिस्टनसिंगच्या सूचना व आपल्या परंपरा जोपासत बाप्पाचा निरोप घेताना दिसत होते






Be First to Comment