Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज सापडले ७ पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ७ जण सापडले आहेत. उपचार करून कोणालाही सोडण्यात तसेच कोणीही मयत नाही.

आज एकूण पॉझिटीव्ह १३७०, उपचार करून बरे झालेले ११२४, उपचार घेणारे १८१, मयत ६५ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज गोसपाडा म्हातवली १, जसखार १, काठेआळी केगाव १, भानुशाली वाडी १, नागाव द्वारकानगर १, एकदंत अपार्टमेंट उरण १, एनएडी करंजा १ असे एकूण ७ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. आज कोणालाही उपचार करून घरी सोडण्यात आले नाही व मयत ही कोणी नसल्याचे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. आजचा पॉझिटीव्हचा आकडा अत्यंत कमी आला आहे. ही एक उरणकरांसाठी जमेची बाजू मानली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.