Press "Enter" to skip to content

आयआरबीचा स्थळदर्शक फलकाची दुरावस्था : वाहन चालकाना चकवा

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶

सावरोली येथील चार फाट्याजवळ असलेल्या स्थळदर्शक फलकाची दुरावस्था झाल्यामुळे प्रवाशांसाठी फलक दिशाभूल फलक ठरत आहे.

मुंबई पूणे द्रूतगती मार्गावरून बाहेर पङल्यानंतर पाचशे मीटर अंतरावर सावरोली चार फाटा आहे.टोल नाक्यावरून बाहेर पङणा-या वाहन चालकांचा चार रस्त्याजवळ गोंधळ उङतो. या ठिकाणी एकञ येणारे चारपैकी तीन रस्ते राज्यमार्गाला तर एक रस्ता राष्ट्रीय महामार्गाकङे जातो.सावरोली चार फाट्यावरून खारपाङा राज्य मार्ग,पेण तसेच पालीला जोङणारा रस्ता आहे.तर एक रस्ता खालापूर शहरातून जुन्या मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्गा कङे जातो.चार फाट्याजवळ आयआयबीचा स्थळदर्शक फलक असून त्यावरिल स्थळ दिसेनाशी झाली आहेत.

या मार्गावरून दररोज शेकङो वाहनांची येजा सुरू असते.विशेषतः राञीच्या वेळेस वाहन चालकाची चार रस्तामुळे  फसगत होवून वळसा पङत आहे.त्यामुळे नवीन स्थळदर्शक फलक बसविणे गरजेचे झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.