Press "Enter" to skip to content

जिल्ह्यातील प्रसिद्ध कबड्डीपट्टू आश्विन पाटील याचा कोरोनाने मृत्यू


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)

उरण तालुक्यातील भेंडखळ गावचा सुप्रसिद्ध कबड्डीपट्टू अश्विन रमेश पाटील (२८) याचा कोरोनाने आज मृत्यू झाला आहे. यामुळे उरण परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. यामुळे जिल्हा उत्कृष्ठ चढाईपट्टूला मुकली आहे.

अश्विनला पहिल्यापासून कबड्डी खेळाची आवड होती. अल्पावधीतच कबड्डीत रायगड जिल्ह्यात उत्कृष्ठ चढाईपट्टू म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. त्याला काही दिवसांपूर्वी कोरोना या विषाणूची बाधा झाली होती.

त्याच्यावर डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये गेले १४ दिवसापासून उपचार सुरू होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. परंतु काल रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने त्याचे आज सकाळी निधन झाले आहे. त्याच्या अचानक जाण्याने सर्व कबड्डी प्रेमी तसेच उरण तालुक्यात हळहळ व्यक्त केले जात आहे.

अश्विनच्या निधनाची वार्ता समजतात भेंडखळ गावासह उरण शहरासह इतर गावात दुःखाचे सावट पसरले आहे. अश्विनच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.