सिटी बेल लाइव्ह / भांडूप 🔶🔷🔶🔷
महावितरणच्या भांडूप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी मुख्य कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेले सुरेश गणेशकर यांनी दि ३१ रोजी मुख्य अभियंता सौ.पुष्पा चव्हाण यांच्याकडून मुख्य अभियंता पदाचा पदभार स्वीकारला.
मुळचे सोलापूरचे रहिवासी असलेले श्री. गणेशकर यांनी आपल्या सेवा काळात विविध महत्वाच्या पदावर काम केले असून १९८९ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून विद्युत मंडळामध्ये सेवेची सुरवात केली. त्यानंतर त्यांची पदोन्नती कार्यकारी अभियंता पदी कन्नड येथे झाली. त्यांनी नगररोड विभागात कार्यकारी अभियंता या पदावर काम करताना या विभागाची वितरण हानी 28% वरून 17% इतकी कमी केली. त्यानंतर अधीक्षक अभियंता म्हणून परभणी मंडळ व सातारा मंडळ येथे त्यांनी महत्वपूर्ण काम केले. २०१६ मध्ये पुन्हा ते औरंगाबाद मुख्य अभियंता म्हणून येथे रुजू झाले.
४ वर्षाच्या कालावधीत त्यांनी बऱ्याच वेळा सह.व्यवस्थापकीय संचालक पदाचा अधिभार खुप चांगल्या पद्धतीने सांभाळून औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे नेतृत्व केले व औरंगाबाद परिमंडळ येथे उत्कृष्ट कामगिरी केली. आज भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर भांडुप परमंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी व संघटना प्रतिनिधी यांनी त्याचे स्वागत केले






Be First to Comment