सुधागड तालुक्यात नवे 14 कोरोना बाधित रुग्ण आढळले..! दोघांचा मृत्यू : एकूण बाधित 193 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 💠🌟💠🌟
सुधागड तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबरोबरच मृत्यदर देखील वाढत असल्याने सुधागड वासीय चिंतेत आहेत. सोमवारी (दि.31) तब्बल 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका 22 ते 23 दिवसांच्या लहान चिमुरडीचा समावेश आहे. तब्बल 12 दिवस तिने कोरोनाशी झुंज दिली. मात्र ही झुंज अपयशी ठरली. या चिमुरडीवर मुंबई येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. चिमुरडीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुधागड तालुक्यात कोरोना रूग्ण वाढत असल्याने प्रशासनाने विविध कृतिशील उपाय योजनांबाबत पुरेपूर लक्ष केंद्र केले आहे, तसेच यामध्ये लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था देखील सहकार्याची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे सुधागड लवकरच कोरोना मुक्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुधागड तालुक्यात आता कोरोनाचे 193 रुग्ण झाले असून आत्तापर्यंत आपल्या दुदैम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास व आरोग्य विभागाच्या यशस्वी प्रयत्नाने कोरोनाचे 124 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि 59 जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत, याबरोबरच प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शासन अटी व नियमांचे तंतोतंत पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.







Be First to Comment