Press "Enter" to skip to content

कळंबोली पोलिसांवर दुःखाचे सावट : सुरेश म्हात्रे यांचा कोरोनाने मृत्यू 

 

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी 🔶🔷🔷🔶

कळंबोली पोलीस ठाण्यावर सध्या दु:खाचे सावट पसरले आहे. येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी सुरेश म्हात्रे यांना आपले कर्तव्य निभावत असताना कोरोनाची लागण झाली होती. रूग्णालयात ते मृत्यू शी झुंज देत होते परंतु अखेर त्यांना यश आले नाही. काल संध्याकाळी त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

दोन दिवसापूर्वी कळंबोली पोलिस ठाण्यातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली होती. पोलीस दलातील कोरोनाग्रस्ताचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी कोरोनाच्या साथीने पोलिस कर्मचारी बळीही पडत आहेत. कळंबोली येथे कार्यरत असलेेले  पोलिस अधिकारी सुरेश म्हात्रे यांचा स्वभाव हसतमुख, मनमिळावू व सहका-याविषयी सहकार्याची भावना होती. त्यांना  डि.वाय .पाटील हॉस्पीटल , नेरूळ नवी मुंबई येथे दाखल करण्यात आलेले होते. उपचार घेत असतांना त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते .

नवी मुंबई पोलीस आयुक्त , पोलीस उप आयुक्त परि -2 , तसेच नवी मुंबई वेलनेस टिम यांनी त्यांचेवर होणारे उपचारांवर विशेष लक्ष देवुन श त्यांची तब्बेत सुधारण्याचे दृष्टीने शर्तीचे प्रयत्न केले . तसेच कळंबोली पोलीस ठाणे कडील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांची प्रकृती बरी होणे करीता इश्वराकडे प्रार्थना केल्या होत्या . परंतु उपचारास त्यांचे शरीर पुर्ण प्रतिसाद दिला नाही व 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वा . दरम्यान त्यांचे निधन झालेले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.