Press "Enter" to skip to content

चक्क रस्त्यावरच्या खड्ड्यात बसून प्यायला चहा

आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसाद चौलकर यांचे मुरूड रस्त्यावरील नांदगाव येथे अनोखे आंदोलन ! 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / धनंजय कवठेकर / रायगड 🔶🔷🔷🔶

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसाद चौलकर यांनी अनोख्या स्वरूपात प्रयत्न केला. त्यांनी आज चक्क मुरुड रस्त्यावरील नांदगाव येथील रस्त्यावरच्या खड्ड्यात बसून चहापान केला.

आजपर्यंत या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अनेकजण खड्ड्यात पडून जखमी झालेले नाहीत. अनेकांना मणक्याचे आणि मानेचे विकार सुरू झाले आहेत. गेली अनेक वर्षे हा रस्ता पूर्णपणे दुर्लक्षित असून कोणताही नेता याची दखल घेण्यास तयार नाही. कोरोना प्रमाणेच आपल्याला आता खड्डयांसोबत सुद्धा जगायला शिकलं पाहिजे असे वाटू लागले आहे.

प्रसाद चौलकर यांनी आपल्या देशातील अनेक राज्यात मोटारसायकल वर भ्रमंती केली आहे. शेजारील नेपाळ आणि भूतान देशाग देखील बाईकस्वारी केली आहे पण रस्त्यांची अशा प्रकारची दुरावस्था इतर कुठेही नाही असे ते म्हणतात. केरळ मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडून सुध्दा तेथील रस्ते अतिशय उत्तम दर्जाचे आहेत. ते शासनाच्या अनेक रस्ता सुरक्षा उपक्रमात सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे काही रस्ता सुरक्षेसाठी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. परंतु जर रस्तेच खड्डेमय आणि निकृष्ट असतील तर या सगळ्या कार्यक्रमांचे उद्दीष्ट साध्य होणार नाही असे चौलकर यांचे म्हणणे आहे.

या रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचारामुळे एखाद्या घरातील तरुण मुलाला आपला जीव गमवावा लागू नये, भविष्यात रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात घडू नयेत अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर चांगल्या प्रतीचे रस्ते बनवून गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या आमच्या मुरूड तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला.

येथुन येणा-जाणाऱ्या प्रत्येकाने थांबून माझ्या या उपक्रमाचे कौतुक केलं आणि त्यामुळे अर्थातच माझं मनोबल वाढलं आहे. काही मुंबई पुण्यातुन आलेल्या मंडळींनी विशेष कौतुक केलं आणि मुरुडला येताना होणारा त्रास त्यांनी व्यक्त केला. जाणाऱ्या प्रत्येकाला मी तिथे बसून चहा पिण्यासाठी विचारणा करून औपचारिकता केली. 

प्रसाद चौलकर,
आंतरराष्ट्रीय खेळाडू,
मुरूड जंजिरा

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.