वाहन चालक व अबाल व्रूधाना करावी लागते कसरत ! 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / ( रामचंद्र घोडमोडे – श्रीवर्धन)🌟💠🌟💠
श्रीवर्धन तालुक्यातील तहसील कार्यालय,व प्रांत ऑफिस.तसेंच भूमिअभिलेख व दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जाणारा रस्ता गेले चार ते पाच वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहे.
या महत्वाच्या ठिकाणी नागरिकांची शासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यात पडलेल्या खड्डयांमूळे रस्त्यावरून जाता येता नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी चाकीस्वार असो या पायी चालणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या लगत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे .पण या रस्त्याकडे गेली पाच वर्षे दुर्लक्ष होत आहे.तशा प्रकारच्या तक्रारी संबधित विभागाला दिल्या आहेत़.
नागरिकांना होणाऱ्या त्रासाची व्यथा माजी जिल्हा परिषद सद्स्य अविनाश कोळंबेकर ,समाज सेवक भरत रिकामे व ग्रामस्थांसह श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांच्याकडे व्यक्त केली . व सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जाऊन उपस्थित असलेले अभियंता जेठे व शेटे यांच्याकडे रस्त्याची चौकशी करून लवकरात लवकर रस्त्याची डागडूगी करण्यात यावी अशी विनंती केली . वेळ पडल्यास जनआंदोलन करून रस्त्यावर उतरू तसेंच जनतेच्या ऊद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला.






Be First to Comment