सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी 🔷🔶🔷🔶
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व कोरोना संसर्ग साथीची लागण होऊ म्हणून यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता आम्हाला सहकार्य करा असे आवाहन कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव सणा पुर्वी बैठकीचे आयोजित मा.पोलीस आयुक्त सो, नवी मुंबई, मा. उप आयुक्त सो, परि-2, मा. सहा.पोलीस आयुक्त सो, पनवेल यांचे सूचनेनुसार करण्यात आले होते. त्याला कळंबोली गणेशोत्सव मंडळानी प्रतिसाद दिला.

कळंबोली पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 12 सार्वजनिक व 13 सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी सन 2020 चा गणेशोत्सव साजरा केला नाही. असा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन म्हणून कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या हस्ते गणेशोत्सव रद्द केलेल्या मंडळांना आज प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
सदर मंडळांना गौरविण्यात आल्या बद्दल सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केलेले असून, पोलीस प्रशासनास नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.






Be First to Comment