Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज सापडले 9 पॉझिटीव्ह 17 जणांना डिस्चार्ज


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ९ जण सापडले आहेत. तर १७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
आज एकूण पॉझिटीव्ह १३६३, उपचार करून बरे झालेले ११२४, उपचार घेणारे १७४, मयत ६५ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज चिरले १, जासई १, जसखार २, भेंडखळ १, चाणजे १, नवापाडा करंजा १, पागोटे १, जेएनपीटी टाऊनशीप १ असे एकूण ९ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर नागाव ३, मोरा १, कोटनाका १, गोवठणे १, ओमकार कॉलनी कुंभारवाडा १, आवरे १, करंजा १, प्राईम प्लाझा करंजा रोड १, नवीन शेवा १, जासई १, जेएनपीटी टाऊनशीप १, द्रोणागिरी नोड १, उरण ३ असे एकूण १७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.

उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी जास्त होत आहे. आज ९ जण पॉझिटीव्ह सापडले. तर १७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. यावरून उरणमध्ये कोरोना प्रादुर्भाव कधी वाढतो तर कधी कमी होतो. यामुळे जनतेने बेसावध न रहाता योग्य ती खबरदारी घ्यावी.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.