कोरोनाकाळात आलेली अवाजवी वाढीव वीज बिले न भरण्याचे मनसेचे सुधागवासीय जनतेला आवाहन !
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷
सुधागड तालुक्यातील गोरगरीब, आदिवासी, सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी असल्याचे सांगत येथील नागरिकांच्या वाढीव वीज बिले व अन्य वीज समस्यांसंदर्भात मनसेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. विजप्रश्नावर महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
कोरोनासारख्या राष्ट्रीय संकटाने बेजार झालेल्या जनतेला वाढीव वीजबिलांनी रडकुंडीला आणले आहे. युनिट दरापेक्षा जास्त विद्युत देयके देऊन विजवीतरण महामंडळाने जनतेला वेठीस ठरले आहे. यासंदर्भात पाली विज वितरण कार्यालयाचे उप अभियंता श्री पाटील यांच्याशी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांनी चर्चा करुन ताबडतोब नागरिकांना आलेली युनिट दरापेक्षा जास्त बिले त्वरित कमी करा, अशी मागणी केली. यावर श्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात मंगळवार दिनांक 1/9/2020 रोजी सकाळी 11 वाजता बैठक आयोजीत केली आहे.
दरम्यान सुधागडवासीय जनतेने आपल्याला आलेली अवाजवी व वाढीव वीज बिले न भरता विजवीतरण विभागाने आयोजीत केलेल्या बैठकीस उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांनी केले आहे.






Be First to Comment