Press "Enter" to skip to content

ऑगस्ट अखेर वासांबे मोहोपाडा जि प हद्दीत ३९९ कोरोना बाधित

२८४ कोरोनामुक्त, आठ जणांचा मृत्यू तर १०७ जणांवर उपचार सुरू 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे 🌟💠🌟💠

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे.यातच परीसरातील इतर भागापेक्षा कोरोनाचे रुग्ण वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत श्रावणात वाढतच असल्याने चिंतेची बाब असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ७३ टक्के आहे.मात्र श्रावणानंतर कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख दिलासादायक असल्याचे दिसून येत आहे.

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील कोरोनाग्रस्तांची ३१ ऑगस्ट अखेर झालेली आकडेवारी

चांभार्ली ग्रामपंचायत हद्दीत एकूण ३९ कोरोनाग्रस्त,बरे झालेले रुग्ण २५,मयत 1,उपचार घेत असलेले रुग्ण १३

लोधिवली ग्रामपंचायत हद्दीत एकूण ४५ कोरोनाबाधित ,बरे झालेले ४१,मयत शून्य, उपचार सुरू असलेले रुग्ण ४

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत एकूण ३१५रुग्ण, एकूण बरे २१८ रुग्ण, एकूण मयत ७ रुग्ण, उपचार सुरू असलेले ९० रुग्ण

तर मैहोपाडा जिल्हा परिषद विभागानजीकच्या चौक मंडलातील चौक ग्रामपंचायत हद्दीत आॅगस्ट अखेर ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.वडगाव ग्रामपंचायत हद्दीत २,वावर्ले ग्रामपंचायत हद्दीत २,तुपगाव ग्रामपंचायत हद्दीत ३,टेंभरी ग्रामपंचायत हद्दीत १,कलोते ग्रामपंचायत हद्दीत १,तर इसांबे ग्रामपंचायत,वावंढल ग्रामपंचायत,आसरे या ग्रामपंचायत हद्दीत आॅगस्टअखेर शून्य रुग्ण आहेत.

दरम्यान ऑगस्ट अखेर चौक मंडलात एकूण ५९३ रुग्ण संख्या असून यातील ४५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर एकूण १२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.खालापूर तालुक्यात वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनारुग्णांची संख्या लक्षणीय असून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनासंसर्गांचा आलेख सप्टेंबर महिनाअखेर दिलासादायक राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.तरीही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता आपली सोशल डिस्टिंक्शनचे पालन करुन आपल्या कुटुंबाची खबरदारी घ्यावी असे आवाहन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.