Press "Enter" to skip to content

हाल इथले संपत नाहीत…

पनवेल उपजिल्हा रुग्णालय कोविड विभागाचा पाणीपुरवठा ठप्प !! रुग्णाचे होतात हाल ! ###

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी ###

 पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड विभागाचा पाणीपुरवठा बऱ्याच दिवसांपासून ठप्प असून, रुग्णांना तात्पुरते ड्रम मधून पाणी आणून देऊन, त्यांचा प्रातविधी व स्नान तसेच पिण्याच्या पाण्याची , आणि दैनिनदीन इतरही पाण्याची गरज भागवली जात नसल्याचे वास्तववादी वृत्त हाती लागले आहे. विशेष म्हणजे सदरच्या कारणाने रुग्णांची मात्र चांगलीच हेलसांड होत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे सदरच्या वृत्ताला वैद्यकीय अधिक्षक जिल्हा उप रुग्णालय पनवेल श्री एमपल्ली यांनी दुजोरा दिला आहे. कोरोनाच्या साथीत स्वच्छता असणे आवश्यक आहे त्यात रुग्ण वाढीला आळा घालू शकतो.  

महापालिकेने अधिगृहित केलेल्या कोविड उपजिल्हा रूग्णालयात रूग्णाना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या रुग्ण संख्येने व्हेंटिलेटर व आँक्सिजन बेडची कमतरता असून रूग्णांची मोठी गैरसोय होवून रुग्ण दगावण्याची जास्त भिती असते.  कोरोना रुग्णावर वेळीच उपचार होवून त्यांचे कोरोना विषाणू पासून संरक्षण करता यावेत. म्हणून पालिकेकडून आरोग्या विषयी महत्वाचे निर्णय घेण्यात यावेत अशी मागणीही सर्व पक्ष व संघटनांकडून  केली जात आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींना येत आहेत. त्याचबरोबर कोरोना रुग्णांवर सुद्धा आवश्यक ते उपचार करताना डॉक्टरांचे हात तोकडे पडत आहेत . विशेष करून इतर आजार असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामध्ये वयोवृद्ध कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे . त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन बेडची आवश्यकता आहे . परंतु या सुविधांची कमतरता असल्याने गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णावर उपचार करताना अडचणी येत आहेत . तेव्हा डॉक्टर आणि खाटा वाढविताना महापालिका क्षेत्रातील सामाजिक, राजकीय पक्षांसह खासगी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका ताब्यात घ्याव्या. जेणे करून रुग्णवाहिका उपलब्ध होई पर्यंत एखाद्या रुग्णाला आपले प्राण गमवावे  लागणार नाही असा अनेक अडचणीं येथील रुग्णावर उपचारात येत आहेत  कोरोना रुग्णांच्या मानाने डॉक्टर महापालिकेकडे नाहीत. ती मोठी अडचण आहे. रुग्ण वाढतात पण डॉक्टरांबरोबर आँक्सिजन बेडच्या कमतरतेमुळे  अनेकदा covid – 19 रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात . त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात . या भितीपोटी काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. तेव्हा कोरोना रुग्णांवर करण्यासाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची संख्या कमी असल्याने रुग्णाना दवाखान्याच्या वा-या करताना जीव गमवावा लागत आहे.

आमच्या प्रतिनिधीने त्याच्याशी सम्पर्क साधल्यावर,  सत्य उजेडात आले आहे. वैद्यकीय आधीक्षक श्री एमपल्ली यांच्या म्हणण्यानुसार, सदोष पाईपलाईन टाकल्याने सदरचा प्रकार उदभवला असल्याचे त्यांचेमत आहे.  महाराष्ट्रात साधारणतः जानेवारीत किरोना या अतिभयंकर आशा महामारी साथच्या रोगाला सुरवात झाली व टप्प्या टप्प्याने संपूर्ण देश या साथीच्या संकटाचा शिकार झाला कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता 24 मार्च पासून सम्पूर्ण देशात  केंद्र सरकारने लाँकडाऊन घोषित केले. रायगड जिल्हातील मुख्यत्व करून पनवेल महानगरपालिका हद्दीतील दिवसेदिवस रुग्णांची वाढती संख्या एक चिंतेचा विषय होता.  रायगडजिल्हा व पनवेल महापालिका हद्द , आसा मोठा परिसर असल्याने व पनवेल महापालिका हद्दीत शहरीकरण असल्याने, लोकसंख्येची घनता जास्त आहे,. पर्यायाने, रुग्णांचा चढता आलेख पाहता पनवेल उपजिल्हा रुग्णालयात  आरोग्य खात्याने  कोविड विभागाची व्यवस्था केली आहे. परंतू या विभागात पाणीपुरठ्याची व्यवस्था करण्यात न आल्याने रुग्णांना मात्र प्रातविधीसाठी सुद्धा पाण्याची वणवा भासत आसल्याची तक्रार येथील रुग्ण नोंदवत आहेत. पाण्याची व्यवस्था करण्यात न आल्याने अस्वच्छता पसरून , रोगाला अजूनच आमंत्रण मिळण्याची शक्यता आसल्याची भीती येथील रुग्ण करत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

 कोविड रूग्णालयातील एक्स-रे यंत्रणा बिघडली तर कोविड रूग्णांची एक्स रे द्वारे तपासणी करण्यास अडचण होऊ शकते, त्यामुळे तिथे वातानुकुलीत यंत्रणा बसविण्यात यावी. तसेच कोविड सेवेतील डॉक्टरांना विश्रांती मिळावी, म्हणून तिथे नव्या डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात यावी, अशा महत्वाच्या मागण्यांचे निवेदन आज देशमुख यांना पाठविण्यात आले आहे.   

रुग्णालयातील कोविड विभाग असणाऱ्या ठिकाणची पाईप लाईन निकृष्ट प्रतीची आहे . अर्थातच पाईप लाईन सदोष दर्जाची आहे. त्यामध्ये त्रुटी असल्याने , टाकताना त्यामध्ये चुकीचं तंत्र वापरलं गेल्याने पाणीपुरवठा होत नाही.  

वैद्यकीय आधीक्षक पनवेल उप जिल्हा रुग्णालय

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.