सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔶🔷
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय वर्षा बंगला या निवासस्थानी आमदार महेंद्र थोरवे यांनी गणपती दर्शनासाठी उपस्थिती दाखवली. हे गणराया देशावरील हे कोरोना नामक संकट लवकर दूर कर आणि या जनतेला मोकळा श्वास घेऊ दे, अशी आमदार महेंद्र थोरवे यांनी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.

आज याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या मतदार संघातील आढावा मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिला. आगामी काळात विकासात्मक दृष्टीने कर्जत खालापूर मतदार संघाकडे विशेष लक्ष देण्याचे मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी आश्वासन दिले. या भेटी दरम्यान रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी देखील उपस्थित होते.



Be First to Comment