कर्जतमध्ये संभाजी ब्रिगेडची मागणी !
सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे 🔶🔷🔷🔶
भारत देश एकसंघ राहून ज्या संविधानाच्या जोरावर टिकून आहे आणि त्यामुळेच भारतीयांना स्वातंत्र्य – बंधुता – न्याय हे अधिकार मिळाले आहेत , त्या महान ग्रंथाचा कोणी अवमान करत असेल तर त्याला शासन होणे गरजेचे आहे . अभिनेता प्रवीण तरडे याने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवर गणपती मूर्तीच्या खाली संविधानाचा हा महान ग्रंथ ठेवलेल्याचा फोटो टाकला होता . त्यामुळे राज्यातून अभिनेता प्रवीण तरडे याच्यावर संतापाचे वातावरण निर्माण झाले होते .
या अक्षम्य कृत्याबाबत अभिनेता प्रवीण तरडेवर भारतीय संविधानाचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती .
आज कर्जतमध्ये देखील संभाजी ब्रिगेडचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री आकाश कांबळे यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे प्रवीण तरडे याच्यावर भारतीय संविधानाचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा यासाठी निवेदन देण्यात आले , यावेळी त्यांच्या समवेत संभाजी ब्रिगेडचे तसेच इतर बहुजन संघटनेचे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .


Be First to Comment