सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔷🔶
गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात रसायनी पाताळगंगा विभागातील गौरी -गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.रसायनी पाताळगंगा विभागात दीड दिवसाच्या जवलपास 450 तर पाच दिवसांच्या 1342 गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.तर परीसरातील 386 गौराईंचे भक्तिभावाने विसर्जंन करण्यात आले.

कोरोना महामारीचा वाढत चाललेला प्रकोप पाहता विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांनी सोशल डिस्टन्सिंग व कायदा सुव्यवस्थेचे पालन करुन कोरोनापासून सर्वांची लवकरच सुटका कर असे साकडे विसर्जनाच्या वेळी भक्तांनी गणेरायाला घातले.
मुसळधार पाऊस व कोरोना महिमारीचा वाढत चाललेला प्रकोप या पार्श्वभूमीवरही गणेश भक्तांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता.गौरी गणपतींना निरोप देत असताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच डोळे पाणावले होते.विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.रसायनीतील रिस पुल,कांबे नदिघाट,मोहोपाडा तलाव,वावेघर घाट,पाताळगंगा नदी आदी ठिकाणी गौरी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.



Be First to Comment