बाप्पास पत्र ||श्री||
प्रिय गणपती बाप्पा…
साष्टांग दंडवत
पत्र लिहिण्यास कारण की आपले आगमन झाले आहे. आपले आगमन म्हणजे संपूर्ण चराचर सृष्टीत उत्साहाचा, आनंदाचा,परिपूर्णतेचा एक सोहळा असतो.यावर्षी सगळा उत्साह थंड झाला आहे,कारण माणसांपासून,देवां पर्यंत सगळे बंदिस्त आहेत. कोरोना रूपी राक्षस. हो राक्षस! हा तुमच्या वेळेसारखा अक्राळ विक्राळ असा आकाराने जरी नसला आणि न दिसणारा असा जरी असला तरी तो खूप क्रूर आहे.त्याने आतापर्यंत जगात लाखो लोकांचा बळी बळी घेतला आहे.पूर्वी जसा एखादा राक्षस श्री भगवान शंकरांची उपासना करून त्यांना प्रसन्न करून वर प्राप्त करून घेई तसे सध्या कैलास मानस सरोवर, कैलास पर्वत, हे चीनच्या ताब्यात आहेत त्यानेच कोरोना रुपी राक्षस निर्माण करून हा उच्छाद मांडला आहे असे म्हणतात. ह्या कोरोना रुपी राक्षसाने आत्ताच्या घडीला पृथ्वीवर हाहा:कार माजवला आहे.आज सर्व मानव जात घाबरलेली असून तोंडावर मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, कोणालाही स्पर्श न करणे, घरातून बाहेर न पडणे, सण, उत्सव एकत्र साजरे न करणे या समस्यांतून जात आहे. यामुळे सर्व उद्योग धंदे, शाळा कॉलेजेस, सगळे बंद झाले आहेत. थोडक्यात काय पूर्वी जसे एखाद्या राक्षसा बरोबर युद्ध करून समस्त देव,मानव जातीला त्या राक्षसाच्या तावडीतून तुम्ही सोडवले तशी परिस्थिती आहे. बाप्पा तुम्ही विघ्नहर्ता आहात.तुम्ही डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, ऍम्ब्युलन्स,सफाई ,वीज,बँक , फायर,सरकारी कर्मचारी, भाजीपाला, फळे, किराणा दुकानदार,यांच्या रूपाने धावून आलाच आहात, परंतु आपले हे रूप कणभर असल्यासारखे आहे. आता आपण पूर्ण रुपाने येऊन या करोना रुपी राक्षसाचा संपूर्णपणे नायनाट करून या पृथ्वीला सुजलाम सुफलाम करावे व सर्व मानवजातीस, देवांना मुक्त करावे हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना.
आपला
धनंजय देशमुख, नवीन पनवेल
Be First to Comment