सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार ) 🔷🔶🔶🔷
कोलाड विभागात गणेश चतुर्थीला घरोघरी स्थापना करण्यात आलेल्या गणरायांचे आज सहाव्या दिवशी मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.
गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीमय वातावरणात घरोघरी आगमन झालेल्या गणरायांचे आज मोठ्या जल्लोषात व भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीची तमा न बाळगता गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या अशाप्रकारचा जयघोष करीत कोलाड विभागातील तमाम गणेशभक्तानी आपल्या लाडक्या बाप्पांना भक्तीमय वातावरणात निरोप दिला.
गणेश चतुर्थीच्या मोठ्या आनंददायी वातावरणात गणरायाची घरोघरी स्थापना केल्यानंतर दररोज धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम साधेपणाने संपन्न करण्यात आले. सध्या कोरोना महामारीचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता कुठेही धोका उत्पन्न होऊ नये यासाठी शासकीय नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.पाच दिवसांचे विश्रांतीनंतर विसर्जनाचे सहाव्या दिवशी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी विराजमान झालेल्या बाप्पांना निरोप देण्यात आला.
Be First to Comment