सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर) 🔷🔶🔷🔶
नगरपंचायतीच्या हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात गणेशचतुर्थीला शनिवारी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांतील कोरोना रूग्णांच्या माहितीमुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी अत्यल्प दिसून आली.
यावर्षी मंडळाचे अध्यक्षपद सिध्देश शेठ, कार्याध्यक्ष अमरदीप नगरकर, उपाध्यक्ष अवधूत मोहिरे व महेश निकम, खजिनदार संकेत आंबावकर, सचिव सिध्देश शेठ, सहसचिव शुभम दरेकर आणि सहखजिनदार रितेश मोरे आदींसह कार्यकर्ते व गणेशभक्तांनी यावर्षी कोरोना जनजागृती आणि विविध सामाजिक संदेश देणाऱ्या फलकांसह आकर्षक देखावा आणि रोषणाई सजावट केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलादपूर शहरासह तालुक्यामध्ये सातत्याने स्थानिकांचा उपचारादरम्यान अन्यत्र मृत्यू झाल्याच्या बातम्या चर्चेत आल्याने कमालीची भिती पसरली असून यापार्श्वभूमीवर जरी गणेशोत्सवाला भाविकांचा प्रतिसाद मिळत नसला तरी पाच दिवसांचे गौरीगणपतींचे विसर्जन झाल्यानंतर भाविकांच्या गर्दीत वाढ होऊ शकेल, असे कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Be First to Comment