सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार) 🔷🔶🔶🔷
कोरोना चे सावट असतानाही गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात होऊन श्रीगणेश भक्तगणांच्या निवास्थानी विराजमान झाले.मोठ्या आनंदात पाचदिवस भक्तगणांनी गणरायाचे पूजन भक्तिमय वातावरणात केले.
आज गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पाच दिवसाच्या गणरायांना मोठ्या आनंदात निरोप देण्यात आला तसेच गौराईचे ही विसर्जन करण्यात आले. पेण तालुक्यातही पाच दिवसाच्या गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला यावेळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मंडळींनी गणरायाचे दर्शन घेऊन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना गणरायाकडे केली तसेच कोरोना चे संकट दूर करण्याची याचना केली तर गणेश भक्तांनी पाच दिवस स्वतःची व इतरांची काळजी घेतली .
पाच दिवसाच्या गणरायांना नदीकाठी तसेच घरा जवळ विसर्जनाची उपायोजना करून गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले पेण नगरपालिकेकडून ही कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.


Be First to Comment