कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे कृत्रिम तलावांमध्ये बाप्पाचे विसर्जन 🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 💠🌟💠🌟
दरवर्षी आपण गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो मात्र या वर्षी या सणाला कोरोना चे सावट आहे, कोरोना विषाणूचा प्रादर्भाव असल्याने यावेळी शासनाने हा सण साजरा करताना काही नियमाचे पालन करण्याच्या आदेश दिले होते, शासनाच्या आदेशनानुसार गणपती सण साजरा करण्यात येत आहे.
दि.22 ऑगस्ट रोजी गणरायाची स्थापना झाली आज दि. 27 ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील पाच दिवसांच्या 5983 गणपतीचे तर 2610 गौरीचे विसर्जन करण्यात आले. कर्जत तालुक्यात सार्वजनिक गणपती 6, घरगुती गणपती 5977 तर 2610 गौरीचे विसर्जन करण्यात आले. पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणेत बाप्पाला निरोप देण्यात आला. कर्जत मध्ये दीड दिवसांच्या गणपती विसर्जन वरून राजकीय वातावरण तापले होते.
त्यामुळे गणपती विसर्जन कृत्रिम तलाव मध्ये का? नदीवर करायचे या वादात काहींनी तलावात तर काहींनी नदीवर गणपतीचे विसर्जन केले.
# कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक गणपती 5, घरगुती गणपती 3830, तर गौरी 1346.
# नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक गणपती नाही, घरगुती गणपती 2083, तर गौरी 1252.
# माथेरान पोलीस स्टेशनच्या हद्दीत सार्वजनिक गणपती 1,घरगुती गणपती 64 तर गौरी12.
कर्जत तालुक्यात येणाऱ्या कर्जत पोलीस ठाणे, नेरळ पोलीस ठाणे आणि माथेरान पोलीस ठाणे या तीन पोलीस ठाण्याच्या मध्ये सार्वजनिक 6, खाजगी म्हणजे घरगुती 5977 गणपती तर 2610 गौरीचे आज विसर्जन करण्यात आले.
काहींनी कृत्रिम तलावात, काहींनी नदीवर तर काहींनी आपल्या आवाराच्या तलावात, विहिरीत आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले.
Be First to Comment