चौक येथील विसर्जन नियोजनाचे सर्वञ कौतुक 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🌟💠🌟💠
विघ्नहर्ता कोरोनाचा विघ्न दूर कर अशी प्रार्थना करत खालापूरात पाच दिवसाच्या गणपतीला निरोप देण्यात आला.यावेळी तीन दिवस दङी मारून बसलेला वरूणराजा देखील गणराजाच्या विसर्जनात सामील झाला होता.खालापूर तालुक्यात जवळपास 4500 घरगुती गणपती तर 19 सार्वजनिक गणपतीचे गुरूवारी गौराई बरोबर विसर्जन करण्यात आले.कृञिम तलावात विसर्जनाची खालापूर पहिलीच वेळ यंदा होती.
दिङ दिवसाच्या विसर्जना दरम्यान काहि ठिकाणी मूर्तीच पाविञ्य राखले नसल्याच्या तक्रारीमुळे पाच दिवसाच्या विसर्जनाला कृञिम तलावाकङे पाठ फिरविण्यात आली.नदि आणि तलावात सामाजिक अंतर पाळत विसर्जन पार पङले.चौक पोलीस दूरक्षेञ आणि ग्रामपंचायतीने रिक्षातून आवाहन करित प्रत्येक भागासाठी वेळ ठरवून दिली होती.त्यामुळे नागरिकाना विसर्जन सोयीचे आणि मनासारखे करता आले.
चौक पोलीस दूरक्षेञचे सपोनी संजय बांगर यानी केलेल्या व्यवस्थेचे प्रसिद्ध शिवव्याख्याते यानी कौतुक केले.
Be First to Comment