पळी गावची सेलीब्रीटी सीताबाई ! या आजीशिवाय जायची नाही नवरी आणि गौरीही 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / रायगड / धम्मशिल सावंत 🌟💠🌟💠
गौरीचं जागरण ही एक पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककला आहे. तिचं जतन परंपरेच्या नावाखाली आजही ठिकठिकाणी होत आहे. कोवीड महामारीचे सावट या गणेशोत्सवावर पडलेले दिसत असले तरी गौरीचे जागरण काही थांबलेले नाही. नव्वदी पर्यंत वय गेलेल्या आजी सीताबाई जाधव (वय वर्षे 90 ) आजही या परंपरेची साक्ष देत आहे.
अलिबाग तालुक्यातील पळी गावातील ही गाणारी आजी गावातील प्रत्येक कार्यक्रमातील सेलीब्रीटीच! या आजीशिवाय नवरी जायची नाही आणि गौरीही. गौरी येताना, स्थापन होताना आणि रोजच्या जागरणानंतर विसर्जनापर्यंत सर्व भावभावनांवरील गाणी म्हणणे आणि त्या गाण्याला उलट्या पाटावर उभी दांडी फिरवत पार्श्वसंगीत देणं हा एक सांस्कृतिक ठेवा आहे. आता या नादात आजीमुळे घरातील सर्वच सदस्य गौरी जागरणात तल्लीन होतात अगदी लहान नातवंडही.
Be First to Comment