Press "Enter" to skip to content

जाणकारांचे मत : पावसाळ्यात रस्त्यावर साचलेला पाला हा धूप प्रतिबंधकच !

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे


डोंगर माथ्यावर वसलेल्या माथेरान या सुंदर पर्यटनस्थळावर लाल मातीचे रस्ते आजही शाबूत आहेत परंतु दरवर्षी पावसाळ्यात मोठया प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असल्याने शेकडो टन मातीची धूप होत असते.याकामी जर का हे रस्ते टिकवायचे असतील तर निदान पावसाळ्यात तरी रस्त्यावर साचलेला पालापाचोळा काढू नये असे मत येथील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
जवळपास एकूण ५२ किलोमीटर परिसर असलेल्या या ठिकाणी सर्वत्र लाल मातीचे रस्ते आहेत.तर मुख्य महात्मा गांधी मार्ग हा रस्ता सुध्दा काहीशा प्रमाणात लाल मातीचा तर उर्वरित रस्ता पेव्हर ब्लॉकमध्ये बनविण्यात आला आहे.याच रस्त्याची नियमितपणे सफाई कामगारांमार्फत साफसफाई केली जाते. उन्हाळ्यात रस्त्यावर साचलेला पालापाचोळा काढणे आवश्यक आहे परंतु पावसाळ्यात या रस्त्यावर साचलेला पालापाचोळा काढला जात असल्याने छोटे छोटे दगड आणि माती सुध्दा निघते त्यामुळे पावसाळी पाणी या रस्त्यावर पडल्यावर आपोआपच रस्त्याला खड्डे पडत असून रस्त्याचे एखाद्या नाल्यात रूपांतर झालेले पहावयास मिळत आहे त्यामुळेच
मोठ्या प्रमाणात मातीची धूप होत असते. हे रस्ते शाबूत ठेवण्यासाठी उन्हाळ्यात
नैसर्गिकरित्या झाडांचा पडणारा पालापाचोळा साठवून पावसाळ्यात
विविध ठिकाणी रस्त्यावर पसरल्यास हे रस्ते कायमस्वरूपी अबाधीत राहू शकतात.
पूर्वी येथील निम्म्याहून अधिक हॉटेल्स व्यवसाय पावसाळ्यात बंद असायचा त्यावेळी हॉटेलचे मालक हॉटेलसमोरील रस्त्यावर तसेच कंपाउंड मध्ये पालापाचोळा टाकत असत हीच परंपरा आजही येथील माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर आपल्या हॉटेलकडे येणाऱ्या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात पालापाचोळा टाकून रस्त्याची होणारी झीज आणि धूप थांबविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत असतात.नगरपरिषदेने सुध्दा यापुढे रस्त्यावर साचलेला पालापाचोळा पावसाळ्यात सफाई कामगारांमार्फत स्वच्छता न करता तसाच चार महिने ठेवल्यास याच पालापाचोळ्याची माती होऊन रस्त्याला एकप्रकारे अभय मिळणार आहे असे येथील जेष्ठ जाणकारांमधून बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.