कोरोना योध्दांचा करणार सन्मान 🔷🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पनवेल / राकेश खराडे 💠✳️💠✳️💠
मागील 9 वर्षापासून मोठया दिमाखात,उत्साहात,राजेशाही पद्धतीने पनवेलचा राजा चिंतामणी नटून थटून भक्तांच्या भेटीला येतो. यावर्षी कोरोना जागतिक महामारीत कोविड योद्धांच्या पाठीशी पनवेलचा राजा चिंतामणी एका सुरक्षेची भक्तीमय ढाल बनून पाच महिन्यांपासून उभा आहे आणि राहणारच असा विश्वास भक्तांना आहे.
कोरोना महामारीत एक सामाजिक भान राखत यंदाचा गणेशोत्सव सरकारने घालून दिलेल्या नियमावलीत साजरा करीत आहोत. आणि या वर्षीचा गणेशोत्सव कोविड योद्धांना समर्पित करत आहे. म्हणूनच डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी, गोरगरीब, तसेच गरजू लोकांना धान्यवाटप तसेच जीवनावश्यक वस्तू वाटप करणारे समाजसेवक, मेडिकल संस्था चालवणारे प्रशासन आदी सर्व कर्मचारी आणि वेळोवेळी कायम गेल्या नऊ वर्षापासून जेव्हा जेव्हा नागरीकांवर अडचण किंवा कुठल्याही प्रकारची कठीण परिस्थिती आली तर सक्षमपणे प्रत्येक चिंतामणी सेवक उभा राहत आहे आणि भविष्यात देखील राहणार या संकटात देखील आपल्यासाठी हे सर्व उभे आहेत,या सर्व योद्धांचा सत्कार समारंभ करण्यात येणार असल्याचे भक्तांनी बोलताना सांगितले.
Be First to Comment