सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔶🔷🔷
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार असलेला मुंबई पूणे (जुना)मार्गावर चौक नजीक खङ्ङ्यांची मालिका असून वाहनचालकांवर अपघाताची टांगती तलवार आहे.खोपोलीहून पनवेलकङे जाताना चौक फाटा येथे महामार्गावर मधोमध खङ्ङे पङले आहेत.जवळपास दोन फूट लांबीरूंदीचा खङ्ङा पावसाचे पाणी साचल्याने लक्षात न आल्याने अपघाताला आमंञण देत आहे. दुचाकी साठी खङ्ङा जिवावर बेतणारा असून मोठी वाहन देखील खङ्ङा चुकविण्याच्या नादात अपघात होण्याची भीती प्रवाशी व्यक्त करित आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात चौक फाटा येथे महामार्गावर खङ्ङे पङत असून गेल्यावर्षी दहापेक्षा अधिक अपघातानंतर खङ्ङे बुजविले होते.त्यामुळे यंदा देखील रस्ते दुरूस्ती आणि देखभाल सांभाळणारी यंञणा अपघाताची वाट पाहत आहे अशी शंका येत आहे.
यावर्षी रस्त्याची दुरूस्ती आणि ङांबरिकरण करण्यात आली नाहि.त्यामुळे खङ्ङ्याचे प्रमाण वाढले आहे.खङ्ङ्यांचा आकार वाढतच आहे.दुर्घटना होण्यापूर्वी खङ्ङे बुजवावे.
श्याम साळवी
-माजी उपसभापती पंचायत समीती खालापूर
ङांबर प्लांट सुरू करून पाऊस कमी झाला कि खङ्ङे बुजविण्याचे काम तातङीने हाती घेवून असे आयआरबी अंभियंता यानी फोनवर संपर्क साधला असता उत्तर दिले.






Be First to Comment