Press "Enter" to skip to content

पेण बाजार पेठेत खरेदी साठी नागरिकांची तुफान गर्दी

गणेशोत्सवात गणेशभक्तांचा उत्साह कायम राहणार ! 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पेण ( प्रशांत पोतदार) ✳️💠✳️💠 

कोरोनाचे संकट असताना देखील गणेशोत्सवावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसुन येत नाही गणेश भक्तांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे.गणेशोत्सवाच्या तयारीच्या खरेदीसाठी पेण बाजार पेठेत आज शुक्रवार रोजी तुफान गर्दी केली होती.

सध्या घरोघरी गणेश भक्तांची लगबग पहायला मिळत आहे. घरा घरात रंगरंगोटी, आरास करण्याचे काम जोरात सुरु आहे. कोरोना, पाऊस यामुळे गावोगावचे गणपती आधीच टेम्पोतून घरी आणण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा बाजारपेठेत खरेदीची झुंबड नसेल असे जाणवत होते परंतु लोक सावधपणे बाजार पेठेत खरेदी करत आहेत यामुळे गणेशोत्सवात हि गणेश भक्तांचा उत्साह असणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाला (शनिवार दि. २२ ऑगस्ट पासून )सुरुवात होत आहे.तर २८७ सार्वजनिक गणपती तर १ लाख २३९ घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.तसेच गणेश चतुर्थीला  पेण पोलीस ठाणे हद्दीत १४  सार्वजनिक व ५ हजार  ७१५ घरगुती गणपती, वडखळमध्ये ५ हजार५३७  घरगुती गणपती तर दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत २ सार्वजनिक आणि ३ हजार ३८३घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.